Sangvi : सांगवी परिसरातील वाहतुकीत बदल

0

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी वाहतूक विभागाच्या हद्दीतील ढोरे पाटील सबवे मधून औंध डी-मार्टकडे जाणा-या पुलाजवळ नवीन पूलाचे काम कराण्यात येणार आहे. त्यासाठी परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी आदेशाद्वारे सांगितले आहे.

सांगवी वाहतुक विभागाच्या हद्दीतील ढोरे पाटील सबवेमधून औंध डी मार्टकडे जाणारा पुल पुर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.पर्यायी मार्ग म्हणून राजीव गांधी पुलावरुन औंध मार्गे इच्छित स्थळी. तसेच रक्षक चौकाकडून पिंपळे निलख- बाणेर मार्ग इच्छित स्थळी जाता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.