Sangvi : धनादेशावर बनावट स्वाक्षरी करत भागीदारानेच नऊ लाखाला गंडविले

एमपीसी न्यूज – भागीदाराची धनादेशावर बनावट स्वाक्षरी करत कंपनीच्या बँक खात्यातील नऊ लाखाची रक्कम दुस-या भागीदाराने स्वत:च्या खात्यावर जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार नुकताच पिंपळेगुरव येथे उघडकीस आला.

याप्रकरणी गिरीधार गोविंद परमानंद (वय 60, रा. गंगोत्रीनगर, पिंपळेगुरव) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत चिराग पुरुषोत्तम राठोड (वय 45, रा. पिंपळेगुरव)यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड आणि परमानंद यांची भागीदारीत एक कंपनी असून बँकेत कंपनीच्या नावे संयुक्त खाते आहे. परमानंद यांनी कंपनीच्या धनादेशावर राठोड यांची बनावट स्वाक्षरी केली. त्यावर नऊ लाख रुपयाची रक्कम टाकत तो धनादेश परमानंद यांनी स्वत:च्या बँक खात्यावर जमा करत राठोड यांची आर्थिक फसवणूक केली. हा गुन्हा भोसरी पोलिसांकडून सांगवी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.