Sangvi : श्वानने केलेल्या लघुशंकेवरून वाद; दोघांमध्ये तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज – श्वान(कुत्र्या)ने केलेल्या लघुशंकेवरून दोन जणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.

धीरेन कांतीलाल चौहान (वय 20, रा. राधिका कुंज, नेताजी नगर, नवी सांगवी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उत्तम शिखरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच इमारतीत राहत आहेत. फिर्यादी हे शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांच्या श्वान (कुत्र्या)ला सोबत घेऊन दूध आणण्यासाठी जात होते.

त्यावेळी फिर्यादी यांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या आरोपी याने फिर्यादी यांना ‘तुझ्या कुत्र्याला इथे लघवी का करायला लावली?’, असे म्हणत शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच लोखंडी सळईने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.