Sangvi : बंद घराचे लॉक उचकटून दोन घरातून हजारोंचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – बंद घराचे कुलूप तोडून तसेच उघड्या खिडकी द्वारे घरातून सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप आणि रोकड असा ऐवज चोरून नेला. या घटना हिंजवडी आणि सांगवी परिसरात उघडकीस आल्या.

सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सांगवीमधील विशाल नगर परिसरात एक घरफोडीची घटना उघडकीस आली. त्याबाबत रोहित भालचंद्र निगडे (वय 27) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

  • रोहित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रोहित रविवारी दुपारी दीडच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. ते सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास आले असता त्यांचे घर उघडे दिसले. त्यांनी घराची पाहणी केली असता घरातून 39 हजार पाचशे रुपये किमतीचे 17.4 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे समजले.

हिंजवडीमधील मिस्टिक मेगापोलीस फेज 3 येथे रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास एक घरफोडीची घटना उघडकीस आली. त्याबाबत गौरांग पद्मनाथ पाणिग्रही (वय 33) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • गौरांग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गौरांग यांच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश केला. फ्लॅटमधून वीस हजार रुपये किमतीचे एक लॅपटॉप आणि चार हजार रुपयांची रोकड असा एकूण चोवीस हजारांचा ऐवज चोरून नेला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.