Sangvi Crime : खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी कड्याने मारहाण

एमपीसी न्यूज – खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका 16 वर्षीय मुलाला लोखंडी कड्याने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी सव्वा पाच वाजता शिवनेरी चौक, नवी सांगवी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

संकेत संजय मोहिते (वय 16, रा. कवडेनगर, नवी सांगवी) असे जखमी मुलाचे नाव आहे. त्यांनी याबाबत मंगळवारी (दि. 17) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रिद्धेश पाटील (वय 18), अश्विन चव्हाण (दोघे रा. कवडेनगर, नवी सांगवी) आणि एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत यांनी आरोपींकडे खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांना हातातील लोखंडी कड्याने मारून जखमी केले. त्यानंतर ‘अश्विन इथला भाई आहे, तुला माहित नाही का’ असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.