Sangvi Crime : सिगारेट पेटविण्यासाठी लायटर न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – सिगारेट पेटविण्यासाठी लायटर न दिल्याने एका तरुणाला मारहाण करीत कोयत्याने वार केले. ही घटना नवी सांगवी येथील एम. के. चौक येथे मंगळवारी (दि. 17) रात्री घडली.

_MPC_DIR_MPU_II

आदित्य नरेंद्र मोहिते (वय 26, रा. ढोरे-पाटील फार्म, नवी सांगवी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. 18) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अश्‍विन चव्हाण आणि त्याचे साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर फिर्यादी आदित्य मोहिते हे पान खाण्यासाठी आणि सिगारेट पिण्यासाठी एम. के. चौकातील पान टपरीवर गेले. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी अश्‍विन चव्हाण याने सिगारेट पेटविण्यासाठी लायटर मागितला. त्यावेळी फिर्यादी आदित्य यांनी आरोपीला ‘तुला दिसत नाही का, मी काय करतोय’ असे म्हटले. या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी आपसांत संगनमत करीत शिवीगाळ करीत सुरुवातीला हाताने मारहाण केली. त्यानंतर आरोपी अश्‍विन याने आपल्याजवळील कोयत्याने आदित्य यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.