BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीसोबत प्रेमसंबंध असताना तिला मारहाण करून तसेच तिच्या मोबाईलच्या स्क्रीनचा पासवर्ड बदलला. तसेच तरुणीचे अश्लील फोटो तिच्या फॅमिली ग्रुपवर शेअर केले. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना नोव्हेंबर 2018 ते 9 सप्टेंबर 2019 या कालावधीत घडली.

स्वप्निल सुरेश सांबरे (रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 25 वर्षिय तरुणीने सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी स्वप्निल आणि फिर्यादी तरुणी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. नोव्हेंबर 2018 ते 9 सप्टेंबर 2019 या कालावधीत स्वप्नील याने फिर्यादी तरुणीचा पाठलाग करून पैशांच्या आणि इतर कारणावरून तिला मारहाण केली. अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने तरुणीला दिली.

तरुणीचा मोबाईल घेऊन त्यातील ई-मेल, फेसबुक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम अकाउंट व मोबाईल स्क्रीनचे पासवर्ड बदलले. फिर्यादी तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडिओ तिच्या मोबाईलमध्ये फॅमिली नावाचा ग्रुप तयार करून त्यात व्हायरल केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3