Sangvi : कंपनीतील कर्मचारी महिलेच्या विनयभंगप्रकरणी कर्मचा-यासह अधिकाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीतील कर्मचाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केला. याबाबत तक्रार केल्यावर अधिकाऱ्याने पिडित महिलेलाच शिवीगाळ केली. ही घटना पिंपळे गुरव येथे जून 2018 ते डिसेंबर 2019 या कालावधीत घडली. याबाबत कर्मचाऱ्यासह अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय मित्री आणि बाबुराव होनकोळ (पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 25 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि. 26) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अक्षय आणि बाबुराव हे दोघेही पिंपळे गुरवमधील लॉजिक प्रो लिमिटेड या कंपनीत कामाला आहेत. आरोपी अक्षय हा फिर्यादी तरुणीच्या केबिनमध्ये गेला व त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर कंपनीच्या बाहेर बोलावून पुन्हा विनयभंग केला.

याबाबत पिडित तरुणीने अक्षय याच्या वर्तुणूकीबाबत कंपनीचा एमडी बाबुराव होनकोळ याच्याकडे तक्रार केली. मात्र, त्याने फिर्यादी यांनाच शिवीगाळ करीत दमदाटी केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.