Sangvi : पेव्हर ब्लॉकने मारहाण केल्याप्रकरणी मावस भावावर गुन्हा

एमपीसी न्यूज – रिक्षा चालवणा-या मावस भावाला अडवून मारहाण केली. तसेच त्याच्या पायावर पेव्हर ब्लॉक मारला. यामध्ये भाऊ गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मावस भावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे गोविंद गार्डन चौकात घडली.

शिवराम सतीश जाधव (वय 23, रा. गोडाऊन चौक, आळंदी रोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नागनाथ दगडू जाधव (वायू 23, रा. काळेवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराम आणि नागनाथ मावस भाऊ आहेत. दोघेही रिक्षा चालवण्याचे काम करतात. सोमवारी सायंकाळी शिवराम त्याच्या रिक्षातून गोविंद गार्डन जवळ सार्वजनिक रस्त्याने जात होते. त्यावेळी नागनाथ याने त्याची रिक्षा आडवी लावून शिवराम यांच्या पायावर व डोक्यावर पेव्हर ब्लॉकने मारहाण केली. यामध्ये शिवराम गंभीर जखमी झाले. याबाबात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.