BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : अश्लील फोटो बनवून महिलेला पाठवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा

455
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – महिलेचा चेहरा वापरून अश्लील फोटो तयार केला. तो फोटो महिलेला सोशल मिडियाद्वारे पाठवला. याप्रकरणी मोबाईलधारकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे रविवारी (दि. 10) घडली.

याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारकविरोधात (8862068830, पूर्ण नाव,पत्ता माहिती नाही) या मोबाईल क्रमांक धारकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेचा चेहरा वापरून अश्लील चार फोटो तयार केले. ते फोटो फिर्यादी महिलेच्या मोबाईल फोनवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवले. त्या फोटोखाली आरोपीने ‘कसे आहेत फोटो’ असा मजकूर लिहून पाठवला. याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3