Sangvi : कोयत्याने वार करून लुटल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

Crime against three in robbery case

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणाऱ्या तरुणांना अडवून कोयत्याने मारहाण करून त्यांच्याकडील मोबईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 11) पहाटे चार वाजता ममतानगर, जुनी सांगवी येथे घडली.

याबाबत दुचाकीवरून (एमएच 12 / बीई 2449) आलेल्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पौकी न्युमी, वेंगवोर होरम अशी जखमी तरुणांची नावे आहेत.

याप्रकरणी जखमी तरुणांचा रूम पार्टनर जॉर्ज सॅम्युल नागा (वय 24, रा. ममता नगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चारच्या सुमरास फिर्यादी जॉर्ज आणि त्यांचे मित्र फिरायला गेले होते.

ते ममता नगर येथील बालयोगी आश्रमासमोर आले असता तीन तरुण दुचाकीवरून (एमएच 12 / बीई 2449) आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांना रस्त्यात थांबवले.

एका आरोपीने पौकी यांच्या हातावर आणि वेंगवोर यांच्या पाठीवर कोयत्याने मारून जखमी केले.

त्यानंतर आरोपींनी वेंगवोर यांच्या खिशातून मोबईल फोन जबरदस्तीने काढून घेतला आणि आरोपी ममतानगर जुनी सांगवी या दिशेने पळून गेले.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.