Sangvi Crime : बांधकाम व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

राजू रामा लोखंडे (वय 50), प्रकाश रामा लोखंडे (वय 48, दोघे रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय 56, रा. पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (दि. 31) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा प्रकार एप्रिल 2008 पासून 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पिंपळे गुरव इथे घडला आहे. फिर्यादी चव्हाण हे बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना ‘विलास महादू काशीद यांची जागा आम्ही घेतो. आपण 50-50 टक्के भागीदारीने ती जागा विकसित करू’ असे म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला.

_MPC_DIR_MPU_II

त्यानंतर जागा खरेदी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना पाच लाख रुपये जागा मालक विलास काशीद यांना द्यायला लावले. वाचन चिठ्ठी करताना 15 लाख रुपये, समजुतीचा करारनामा करताना 15 लाख रुपये, कार्यालयीन कामासाठी, संरक्षण भिंत, पाण्याची टाकी बांधण्यासाठी 10 लाख रुपये खर्च करण्यास लावले. तब्बल 45 लाख रुपये घेऊन आरोपींनी फिर्यादी यांना जागा विकसनासाठी न देता त्यांची फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.