Sangvi Crime : सासूला चपलेने मारहाण; जावयाला अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून जावयाने सासूला चपलेने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी साडेचार वाजता पिंपळे गुरव येथे घडली. पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.

याप्रकरणी 37 वर्षीय जावयाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्याच्या सासूने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी महिला हे जावई आणि सासू आहेत. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडण सुरु होते. त्या भांडणाच्या कारणावरून जावयाने शनिवारी सासरवाडीत येऊन सासूला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्यानंतर जावयाने सासूला चपलेने डोक्यावर आणि तोंडावर मारले.

आरोपी जावयाने सिंधी भाषेत सासूला अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत जावयावर मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.