-MPC-TOP-MOST-BANNER-I

Sangvi Crime News : सासूच्या घरात तोडफोड केल्याप्रकरणी जावयासह दोघांवर गुन्हा दाखल

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – तलाक द्यावा, यासाठी सासूच्या घरात घुसून साहित्याची तोडफोड केली. तसेच तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी जावयासह एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) सायंकाळी साई चौक, नवी सांगवी येथे घडली.

इरफान इस्माईल मलिक आणि त्याच्या ओळखीची महिला (दोघेही रा. कोंढवा, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत. अफरोझ युनूस शेख (वय 65, रा. साईचौक, नवी सांगवी) यांनी बुधवारी (दि. 21) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इरफान हा फिर्यादी अफरोझ यांचा जावई आहे. मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास आरोपी इरफान हा फिर्यादी अफरोझ यांच्याकडे आला. फिर्यादी अफरोझ यांना ढकलून देत जबरदस्तीने घरात प्रवेश केला. शिवीगाळ करीत ‘आत्ताच्या आता तुमच्या मुलीला इकडे बोलवा. मला तिला तलाक द्यायचा आहे’, असे त्याने म्हटले.

त्यानंतर महिला आरोपीने फिर्यादी यांच्या गालावर दोन चापटी मारल्या. त्या दोघांनी किचनमधील तव्याने टीव्ही, एसी, ड्रेसिंग टेबल, शोकेस, वाशिंग मशिन, पीओपी तसेच जिन्यातील खिडक्‍यांच्या काचा फोडून नुकसान केले. फिर्यादी यांच्या मुलीला मारण्याची धमकी दिली.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.