-MPC-TOP-MOST-BANNER-I

Sangvi Crime News : घरात भांडण झाले म्हणून तरुणाची नदीत उडी मारून आत्महत्या

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – घरात झालेल्या भांडणानंतर एका तरुणाने नदीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 20) सायंकाळी सांगवी येथे घडली.

गौरव ऊर्फ गोट्या रवींद्र शिंदे (वय 20, रा. पवनानगर गल्ली, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव याचे रविवारी सायंकाळी त्याच्या घरातील सदस्यांसोबत भांडण झाले होते. त्यानंतर तो रागाने घरातून बाहेर पडला. सांगवी येथे त्याने पुलावरून नदीपात्रात उडी मारली.

मात्र नदीपात्रात उडी मारलेला गौरव नसावा म्हणून त्यांच्या कुटूंबियांनी सोमवारी सायंकाळी तो बेपत्ता असल्याची फिर्याद सांगवी पोलीस ठाण्यात दिली. मंगळवारी (दि. 22) दुपारी त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.