Sangvi Crime News : बँकेची अडीच कोटींची फसवणूक; माजी नगरसेवकावर गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – बनावट कागदपत्रांच्या आधारे श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँकेची दोन कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी माजी नगरसेवकासह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2014 या कालावधीमध्ये श्री छत्रपती अर्बन को ऑप बँक लिमिटेडच्या विशाल नगर, पिंपळे निलख शाखेत घडली. याबाबत सोमवारी (दि. 15) सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक विलास एकनाथ नांदगुडे (अध्यक्ष), मुख्य कार्यकारी अधिकारी मॅनेजर देवेंद्र मोहन बारटक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी मॅनेजर रवींद्र शेनफडू सोनवणे, बँक ऑफिसर गायत्री सुहास देशपांडे, बँक कॅशियर हेमलता प्रकाश नांदगुडे, बँक कॅशियर स्मिता कदम, कर्जदार ज्ञानदेव बबन खेडकर, कर्जदार रामलिंग केदारी, कर्जदार तेजस जाधव, कर्जदार यशवंत जगन्नाथ पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत भगवान तुकाराम धोत्रे (वय 51 रा. मु. पो. देहूगाव, ता. हवेली, जि. पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक आरोपींनी आपसात संगनमत करून खोटे आणि बनावट कागदपत्रे तयार केली. ही कागदपत्रे श्री छत्रपती अर्बन को-ऑप. बँक लिमिटेडच्या पिंपळे निलख येथील शाखेत सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी कर्ज आणि ठेवीत गैरव्यवहार करून खोटे हिशोब नोंदवले. बँकेची दोन कोटी 69 लाख 83 हजार 855 रुपयांची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचून बँकेचे सभासद ठेवीदार निबंधक यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.