Sangvi Crime News : जुगार खेळणाऱ्या सहा जुगारींवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – जुगार अड्ड्यावर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने जुगार खेळणा-या सहा जुगारींवर कारवाई केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 8) रात्री जवळकर नगर, सुदर्शन चौक पिंपळे गुरव येथे करण्यात आली.

संदीप किसन रावते (वय 40, रा. पिंपळे गुरव), निखील नंदकुमार पवार (वय 33, रा. नढे नगर, काळेवाडी), संदीप राजेंद्र वडमारे (वय 28, रा. पिंपळे गुरव) राजू दत्तात्रय जाधव (वय 32, रा. नवी सांगवी), नबी दौलत शेख (वय 35, रा. भोसरी), सनी उर्फ चित्रसेन भगवान घरवाढवे (वय 28, रा. पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस हवालदार संतोष बर्गे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली की, पिंपळे गुरव येथील सुदर्शनचौकात रुक्साना शेख यांच्या तीनमजली इमारतीच्या गच्चीवर सनी घरवाढवे याच्या रूममध्ये काहीजण आर्थिक फायद्यासाठी रम्मी जुगार खेळत आहेत.

त्यानुसार पोलिसांनी सनी घरवाढवे याच्या रूममध्ये छापा मारून कारवाई केली. त्यात सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.