Sangvi Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी सासरच्या तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – नवीन घर घेण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. याबाबत पती, सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ही घटना 18 जून 2018 ते 26 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली.

पती यथार्थ योगेश गुप्ता, सासरे योगेश कुमार गुप्ता आणि सासू (तिघेही रा. रोझ आयकॉन, पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पिडित महिलेने गुरुवारी (दि. 4) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून नवीन घर घ्यायचे आहे, असे म्हणत फिर्यादी यांना मानसिक त्रास दिला. तसेच पतीने शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. ‘तू या घरात माझ्यासोबत कशी काय राहते’, अशी धमकी पती यथार्थ याने दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.