Sangvi Crime News : सोशल मीडियावर महिलेची बदनामी; दोघांवर गुन्हा

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – महिलेचे आणि तिच्या पहिल्या पतीचे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामीकारक मजकूर लिहिला. तसेच अश्लील फोटो महिलेला पाठवले. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1ऑक्टोबर2020 ते 1 एप्रिल 2021 या कालावधीत घडला.

योगेश गोपीचंद कामडे (वय 37, रा. रायपूर, छत्तीसगड), मेघा संतोष कथेल (रा. कबीरधाम, छत्तीसगड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 32 वर्षीय महिलेने सोमवारी (दि. 3) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या फेसबुक अकाउंटवरील फिर्यादी आणि त्यांचे पाहिले पती यांच्या फोटोचे स्क्रीनशॉट काढून ते फेसबुकवर पोस्ट केले. फोटोखाली फिर्यादी यांची बदनामी करणारी पोस्ट टाकली. तसेच आरोपींनी फिर्यादी यांच्या आईच्या फेसबुकचे स्क्रीनशॉट काढून ते देखील फेसबुकवर पोस्ट केले. त्यानंतर फिर्यादी यांच्या व्हाट्सअपवर अश्लील फोटो पाठवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 500 (1), 507, 34, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 सी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.