Sangvi Crime News : गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश; 213 सिलेंडर टाक्या जप्त

पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – सांगवी परिसरात सुरु असलेला घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने उघड केला आहे. या कारवाईत तब्बल 22 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 312 गॅस सिलेंडरच्या टाक्या जप्त केल्या आहेत.

सांगवी परिसरात भैरवनाथ गॅस एजन्सीमधील कर्मचारी एका गोडाऊनमधून दुस-या गोडाऊनमध्ये सिलेंडरच्या टाक्या नेऊन तिथे भरलेल्या सिलेंडर टाक्यातून रिकाम्या सिलेंडर टाक्यांमध्ये गॅस काढत होते. हा प्रकार निदर्शनास आल्याने सामाजिक सुरक्षा पथकाने शनिवारी (दि. 20) सकाळपासून तेथे कारवाईला सुरुवात केली.

यामध्ये तब्बल 22 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून भरलेल्या आणि रिकाम्या अशा एकूण 312 गॅस सिलेंडर टाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. हे कर्मचारी 14 टेम्पोमधून या टाक्यांची ने-आण करत होते.

प्रत्येक गॅस सिलेंडरच्या टाकीमधून एक ते दोन किलो गॅस काढून घेतला जात होता. त्यानंतर काढून घेतलेला गॅस टाक्यांमध्ये भरून पुन्हा त्याची विक्री केली जात होती. हे रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले आहे.

सामाजिक सुरक्षा पथकाने यापूर्वी देखील गॅस सिलेंडरचा काळा बाजार अनेकदा उघडकीस आणला आहे. तरी देखील शहरात हे गॅस चोरटे सक्रिय असल्याचे दिसून येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.