Sangvi Crime News : फसवणूकप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

0

एमपीसी न्यूज – बांधकाम परवाना विभागाची परवानगी न घेता खोट्या परवान्याद्वारे चार मजली इमारत बांधली. त्यानंतर एका इमारतीमध्ये सदनिका धारकाची सदनिका त्याच्या परस्पर विकली. तसेच त्या सदनिकेवर फायनान्स कंपनीकडून 14 लाख 55 हजारांचे कर्ज घेतले. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार सन 2012 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला असून याबाबत 7 एप्रिल 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशांत सुरेश शिरसाट (रा. काटेपूरम चौक, पिंपळे गुरव), आशुतोष सुनील नितनवरे (रा. पिंपळे गुरव), दीपक कडूबाळ गायकवाड (रा. पिंपळे गुरव), ज्ञानेश्वर जगदीश पाटील, सुवर्णा ज्ञानेश्वर पाटील (दोघे रा. दिघी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत अनिल मारुती भालेराव (वय 56, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पिंपळे गुरव मधील जवळकरनगर येथे लेन नंबर एकमध्ये कोणत्याही प्रकारचा बांधकाम परवाना न घेता खोट्या परवान्याद्वारे चार मजली इमारत बांधली. तसेच ज्ञानेश्वर पाटील यांच्यासोबत संगनमत करून आरोपींनी फिर्यादी यांच्या मालकीच्या एका सदनिकेची विक्री केली.

विक्री केलेल्या सदनिकेवर आरोपी ज्ञानेश्वर आणि सुवर्णा पाटील यांनी अस्पायर होम फायनान्स, फुगेवाडी या फायनान्स कंपनीकडून 14 लाख 55 हजार 344 रुपयांचे कर्ज घेतले. त्याचेही हप्ते आरोपींनी भरले नाहीत, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment