Sangvi crime News : उसने दिलेले पैसे परत न देता 15 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – हातउसने दिलेले पैसे परत मागितले असता ते न देता फसवणूक केली. तसेच पैसे देणार नसल्याची धमकी दिली. ही घटना 9 मे 2019 ते 8 एप्रिल 2021 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.

राजेंद्र बाबूलाल सुराणा (वय 55, रा. येरवडा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अनिल धरमचंद संचेती (वय 55, रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी विश्वासाने आरोपीला वेळोवेळी 15 लाख दोन हजार रुपये हातउसने दिले होते. ते पैसे फिर्यादी यांनी परत मागितले असता आरोपीने पैसे दिले नाहीत.

पैसे मागण्यासाठी फोन केला असता आरोपीने ‘तुझे पैसे देणार नाही. कोणाला सांगायचे ते सांग. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’ असे उत्तर दिले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.