Sangvi Crime News : ‘डीआरडीओ’मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने 22 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – ‘डीआरडीओ’मध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने दोघांची 22 लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मे 2020 ते जानेवारी 2021 या कालावधीत सांगवी परिसरात घडला.

स्वप्नाली सुरेश साळुंखे (वय 32, रा. नवी सांगवी), निखिल पुरोहित अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्नाली यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आनंद लक्ष्मण जाधव (वय 24, रा. औंध) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आनंद जाधव याने फिर्यादी स्वप्नाली आणि निखिल यांना डीआरडीओमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यापोटी आनंद याने 22 लाख तीन हजार 500 रुपये घेतले. पैसे घेऊन त्याने नोकरी न लावता त्याने फसवणूक केली.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.