Sangvi crime News : डिस्ट्रिब्युटरशिप देण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – डिस्ट्रिब्युटरशिप देण्याच्या बहाण्याने एका व्यावसायिकाची 8 लाख 95 हजार 500 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना 30 सप्टेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020 या कालावधीत कल्पतरू हाऊसिंग सोसायटी, पिंपळे गुरव येथे घडली.

पोपट सजनराव भिसे (वय 53, रा. कल्पतरू हाऊसिंग सोसायटी, पिंपळे गुरव) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 9163199145 आणि 8515957126 या क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फेसबुकच्या माध्यमातून मदर डेअरी फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रा. ली कंपनीची डिस्ट्रिब्युटरशिप देण्याची जाहिरात दिली. त्याद्वारे फिर्यादी यांना वारंवार फोन करून त्यांना डिस्ट्रिब्युटरशिप देण्याच्या नावाखाली त्यांचा विश्वास संपादन केला.

वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी फिर्यादी भिसे यांच्याकडून 8 लाख 95 हजार 500 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना डिस्ट्रिब्युटरशिप न देता त्यांची आर्थिक फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.