Sangvi Crime News : सामाजिक सुरक्षा पथकाच्या छाप्यात 11 लाखाचा गुटख्याचा साठा जप्त

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने जगताप डेअरी, विशालनगर येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल 11  लाख 27 हजार 646  रुपये किमतीचा गुटख्याचा साठा व अन्य मुद्देमाल जप्त केला. आज, शनिवारी सकाळी पावणे सात वाजता ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी एका इसमावर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.

अशोक नाराराम चौधरी ( वय -45, रा. विशालनगर, जगताप डेअरी), असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या आदेशानुसार सामाजिक सुरक्षा पथकाकडून शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई सुरु आहे. आज, शनिवारी पहाटे 4 वाजता विशालनगर येथील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली.

त्यानुसार या पथकाने विशाल नगर येथील अशोक चौधरी याच्यागोदामावर छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा केला असल्याचे पथकाच्या निर्दशनास आले.

या कारवाईत पोलिसांनी 25 लाख 43 हजार रुपये किमतीचा रसिकालाल माणिकचंद आरएमडी पान मसाला, 2 लाख 68  हजार रुपये किमतीचा रसिकालाल माणिकचंद आरएमडी तंबाखू मसाला, 58 हजार 344 रुपये किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला, 48  हजार 960 रुपये किमतीचा केशरयुक्त पान मसाला, 10 हजार 296  रुपये किमतीची तंबाखू, 12 हजार 480  रुपये किमतीची वि-1तंबाखू, 3 हजार 96 रुपयांचा रजनीगंधा सुगंधित पान मसाला, साडे सहा हजारांची गोवा 1000चे पाकिटे, 4 लाख 10 हजारांची मारुती सुझकी कंपनीची कार, पाच हजारांचा मोबाईल आणि 1770 रुपयांची रोकड, असा एकूण 11 लाख 27 हजार 646  रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाशाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धर्यशिल सोळंके, विजय कांबळे, सुनिल सिरसाट, नितीन लोंढे, भगवंत मुळे, अनिल महाजन, अमोल शिद, मारुती करचुडे , राजेश कोकाटे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, योगेश तिडके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.