Sangvi Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 जुलै 2015 पासून 10 जून 2021 पर्यंत पवारनगर, जुनी सांगवी येथे घडला.

पती संदीप अशोकराव गायकवाड (वय 38), सासू कांचन अशोकराव गायकवाड (वय 60), नणंद मनीषा युवराज शिंदे (वय 32, रा. कोथरूड पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील गोष्टी फोन करून त्यांच्या आई-वडिलांना सांगत असल्याच्या कारणावरून पतीने विवाहितेला मारहाण केली. सासूने विवाहितेला घरातील स्वयंपाक व्यवस्थित करत नाही या कारणावरून, तर नंणंदेने फिर्यादी यांना ‘तू काही काम करत नाही’, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.