Sangvi crime News: हुंडा न दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – हुंडा न दिल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. ही घटना 1 सप्टेंबर 2012 पासून 15 ऑक्टोबर 2020 या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली.

पती राहुल वसंत पवार, दीर बबलू वसंत पवार, जाऊ वंदना बबलू पवार, लहान दीर नितीन पवार (सर्व रा. जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 26 वर्षीय पिडीत विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती राहुल याने घरातील किरकोळ कारणांवरून विवाहितेला घालून पाडून बोलून शिवीगाळ केली. ‘मला तुझ्यासोबत राहायचे नाही. तुझ्या माहेरच्यांनी हुंडा दिला नाही’ असे म्हणून राहुल याने मारहाण केली.

अन्य आरोपींनी पती राहुल याला विवाहितेविषयी भडकावून मारहाण व शिवीगाळ करण्यास सांगत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.