Sangvi Crime News : तरुणाच्या प्रपोजकडे दुर्लक्ष केल्याने तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – भर रस्त्यात तरुणीला प्रपोज केल्यानंतर तरुणीने त्या तरुणाकडे दुर्लक्ष केले आणि ती तिच्या कामासाठी निघून गेली. त्यानंतर सहा महिन्यांनी तरुणाने तरुणीसोबत इमारतीच्या लिफ्टमध्ये गैरवर्तन करून मारहाण केली. ही घटना फेब्रुवारी 2021 आणि बुधवारी (दि. 11) पिंपळे गुरव येथे घडली.

ओंकार कदम (रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीडित तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी फेब्रुवारी महिन्यात रस्त्याने पायी चालत जात असताना आरोपीने तरुणीस प्रपोज केले होते. परंतु फिर्यादी यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते. या रागातून तरुणाने तब्बल सहा महिन्यानंतर बुधवारी त्याच्या इमारतीच्या लिफ्टमध्ये तरुणीसोबत गैरवर्तन केले. तसेच तिचा हात पिरगाळून, कानाखाली चापट मारली. तरुणीचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले आणि आरोपी रिक्षातून पळून गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.