Sangvi Crime News : दुचाकीवरून जाणाऱ्या मायलेकींचा कारच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज – दुचाकी वरून जाणाऱ्या मायलेकींचा कारच्या धडकेत मृत्यू झाला.ही घटना शुक्रवारी (दि.4) सांगवी पुलाजवळ वसंतदादा पुतळ्याशेजारी दुपारी चारच्या सुमारास घडली.

याप्रकरणी कपील गिरिधरीलाल अगरवाल (वय 54, रा. प्रिसदर्शनीनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपी कारचालक आकाश विनायक गायकवाड (वय 27, रा. दापोडी) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी व मुलगी ह्या दोघीजणी ॲक्टीव्हा या दुचाकीवरून दापोडीवरून सांगवीकडे जात होत्या. यावेळी आरोपीच्या भरधाव जाणा-या स्कोडा या कारने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरात धडक दिली.

या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मायलेकींचा मृत्यू झाला. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.