Sangvi Crime News: खरेदीच्या बहाण्याने एक लाखाच्या सोन्याच्या चमक्या पळवल्या

एमपीसी न्यूज – सोन्याच्या चमक्या खरेदी करण्यासाठी आलेल्या अनोळखी महिलेने सराफा  दुकानातून 1 लाख 9 हजार 500 रुपयांच्या सोन्याच्या चमक्या चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 31) दुपारी आनंदनगर, जुनी सांगवी येथे घडली.

सुधीर रघुनाथ तरटे (वय 30, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील कावेडीया ज्वेलर्स या दुकानात अंदाजे 45 वर्ष वय असलेली महिला ग्राहक म्हणून रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आली. तिने सोन्याच्या चमक्या खरेदी करण्याचा बहाणा केला.

त्या बहाण्याने ग्राहक महिलेने 43 ग्रॅम 800 मिली वजनाच्या 1 लाख 9 हजार 500 रुपये किमतीच्या सोन्याच्या चमक्याची तीन पाकिटे चोरून नेली. रविवारी दुपारी पावणे दोन वाजता हा प्रकार उघडकीस आला.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.