23.3 C
Pune
गुरूवार, ऑगस्ट 11, 2022

Sangvi Crime News : पूर्ववैमनस्यातून एकाला सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एकाला सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून जखमी केले. ही घटना मुळानगर, जुनी सांगवी येथे रविवारी (दि. 8) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

जयसिंग ढाकू राठोड (वय 36, रा. चिखली घरकुल) यांनी या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्यंकटेश राठोड, लक्ष्मण राठोड, रुपेश राठोड (सर्व रा. मुळानगर, सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची बहीण राजेश्री राठोड (रा. मुळानगर, सांगवी) यांच्याकडे आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लेबर शुभम जाधव (रा. देहू) हा देखील आला होता. शुभम याचा चार्जिंगला लावलेला मोबाईल परत देऊन टाका, असे म्हणाल्याने व जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी फिर्यादीला सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारून जखमी केले. तसेच हाताने व लाथा-बुक्क्यांनी देखील मारहाण केली. त्यानंतर शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news