Sangvi Crime News : पीएमपी बस चालकाला मारहाण करत बसची तोडफोड; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पीएमपी बस अडवून बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. 30) सायंकाळी जुनी सांगवी येथे घडली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

स्वप्नील बाळासाहेब तिखे (वय 22, रा. पाषाण गाव, पुणे), शुभम अरविंद जाधव (वय 21, रा. जाधव वाडा, पाषाण, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत श्रीकांत दत्तात्रय भोकरे (वय 31, रा. फुरसुंगी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोकरे हे पीएमपी बस चालक आहेत. ते शनिवारी दुपारी स्वारगेट-सांगवी बसवर कर्तव्यावर होते. सांगवी येथून पुन्हा स्वारगेट येथे बस घेऊन जात असताना जुनी सांगवी येथे वेताळ महाराज मंदिराजवळ मोपेड दुचाकीवरून (एम एच 12 / एस जे 4570) आरोपी आले. आरोपींनी विनाकारण भोकरे यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच बसच्या काचा फोडून नुकसान करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.