Sangvi Crime News : शिक्षिकेवर बलात्कार करणाऱ्या तोतया निवृत्त एसीपीला सांगवी पोलिसांकडून बेड्या

एमपीसी न्यूज – पैशाची अडचण असलेल्या शिक्षिकेला दहा टक्के व्याजाने पैसे देतो असे सांगून, घरी बोलावले व बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी या तोतया निवृत्त एसीपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

विकास अवस्ती (रा. डायनासोर गार्डन जवळ, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या तोतया निवृत्त एसीपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी (दि.10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे डिसेंबर 2019 ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत घडली.

याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली. पीडित महिलेने पोलिसात तक्रार करू नये, म्हणून त्याने आपण निवृत्त एसीपी असल्याचे सांगितले होते. आरोपीचे किराणा मालाचे दुकान होते. ते दुकान लॉकडाऊनच्या कालावधीत बंद पडले आहे.

पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला शिक्षिका म्हणून नोकरी करते. पैशांची अडचण निर्माण झाल्याने त्यांनी आरोपी विकास अवस्ती याच्याकडे पैशांची मागणी केली.

दरमहा दहा टक्के व्याजाने पैसे देतो, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेकडून दोन कोऱ्या धनादेशांवर व कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. त्यानंतर फिर्यादीला शितपेय देऊन जबरस्तीने लैंगिक अत्याचार केले. तसेच अक्षेपार्ह फोटो काढून घेतले व फिर्यादीला पैसे दिले नाहीत.

तसेच आरोपी फिर्यादी यांच्या कामाच्या ठिकाणी गेला. ‘तू जर नाही आली, तर हे फोटो स्कूलमध्ये व तुझ्या घरच्यांना दाखवून तुझी बदनामी करतो,’ अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीला दुचाकीवरून बसवून घेऊन गेला.

तसेच ‘तू जर ओरडलीस, कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या घरच्यांना मारून टाकीन, मी निवृत्त एसीपी आहे. माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही,’ अशी धमकी देऊन जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.