Sangvi Crime News : धक्कादायक ! पाण्याची मोटार बंद करणाऱ्या अल्पवयीन मुलीचे कपडे फाडले

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीने पाण्याची मोटार बंद केली. त्यावरून तिघांनी तिचे कपडे फाडून तिच्यासोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 24) रात्री जुनी सांगवी येथे घडली.

लहू माने, लक्ष्मण माने, धनंजय माने (सर्व रा. जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाणी भरण्यासाठी नळाला पाण्याची मोटार लावली होती. ती मोटार फिर्यादी यांनी बंद केली. त्या कारणावरून आरोपी लहू याने फिर्यादी मुलीचे कपडे फाडून तिच्याशी अश्लील गैरवर्तन केले. तसेच अन्य दोन आरोपींनी तिला अश्लील भाषेत शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.