-MPC-TOP-MOST-BANNER-I

Sangvi crime News : तडीपार आरोपीला पिस्टलसह अटक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 15) रात्री घोलप कॉलेज जवळ सांगवी येथे करण्यात आली.

मच्छिंद्र हरिकिसन वरकटे (वय 32, रा. इंद्रपरी कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार शैलेश मगर यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मच्छिंद्र वरकटे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 31 ऑक्टोबर 2020 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. असे असताना देखील तो महाराष्ट्र शासनाची अथवा पोलीस आयुक्तांची परवानगी न घेता शहरात आला. आरोपी सांगवी येथील घोलप कॉलेज जवळ आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी मच्छिंद्र वरखडे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी 40 हजार 600 रुपये किमतीचा हा शस्त्रसाठा जप्त करत आरोपीला अटक केली.

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn