Sangvi crime News : घटस्फोटीत पत्नीने बेकायदेशीररित्या घरात घुसून पतीला चपलेने मारले

एमपीसी न्यूज – घटस्फोट झालेला असताना पूर्वीच्या पत्नीने बेकायदेशीररित्या घरात घुसून पतीला बुटाने, चप्पलने मारले. तसेच सुरीने पतीवर वार केले. यामध्ये पती जखमी झाला आहे. ही घटना 23 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पिंपळे सौदागर येथे घडली आहे.

संदीप सिंह बिष्ट (वय 37, रा. पिंपळे सौदागर) असे जखमी पतीचे नाव आहे. त्यांनी याबाबत 20 ऑक्टोबर रोजी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुमन जोशी (वय 37, रा. पिंपळे सौदागर) हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संदीप आणि आरोपी सुमन हे पूर्वी पती-पत्नी होते. त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांतर देखील सुमनने संदीप यांच्या घरात बेकायदेशीररित्या घुसून संदीप यांना शिवीगाळ केली.

त्यानंतर त्यांना बुटाने व चप्पलने तोंडावर मारले. घरातील सुरीने संदीप यांच्या हातावर मारून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III