Sangvi crime News : रिक्षा चालकाला मारहाण करून पळवली रिक्षा

एमपीसी न्यूज – पूर्वीच्या भांडणाच्या रागातून एकाने तरुणाला मारहाण करून रिक्षा, पैशांचे पाकीट आणि कॅबची चावी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 8) रात्री आठ वाजता पिंपळे गुरव येथे घडली.

इस्साक रज्जाक शेख (वय 24) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सुमित गायकवाड (वय 30, रा. पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत मुमताज शेख (वय 50, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुमताज यांचा मुलगा इस्साक याचे आरोपी सुमित याच्याशी मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यावरून सुमित याने सोमवारी रात्री आठ वाजता इस्साक याला पिंपळे गुरव येथील कल्पतरू सोसायटीच्या गेटवरील रिक्षा स्टॅन्डवर दगडाने आणि हातोड्याने मारहाण केली.

त्यानंतर इस्साक याच्याच रिक्षातून त्याला औंध रुग्णालय येथे सोडले. त्यानंतर रिक्षा, मोबाईल फोन, पैशांचे पाकीट आणि कॅबची चावी, असा एकूण 22 हजारांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.