Sangvi crime News : महागडे मोबाईल चोरी करणाऱ्या तीन  चोरटयांना अटक, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – महागडे मोबाईल फोन हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या तीन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारकडून अटक करण्यात आली आहे. नवी सांगवी येथील सृष्टी हॉटेल चौक येथून त्यांना आज अटक करण्यात आली. जबरी चोरीचे तीन गुन्हे उघड करुन त्यांच्याकडून 2 लाख 1 हजार किंमतीच्या दोन मोटारसायकल तसेच विविध कंपन्यांचे एकूण चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले.

अशितोष प्रदिप परांडे (वय 19, रा.साईसिद्धी पार्क, बॉम्बे कॉलनी, दापोडी) अभिषेक मुकुंद बारटक्के (वय 20, रा.बापु काटे चाळ, बॉम्बे कॉलनी, दापोडी ) व मतीन जुबेर शेख (वय18, रा. दळवी चाळ, बॉम्बे कॉलनी, दापोडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मागील तीन महिन्यात सांगवी व भोसरी पोलीस ठाणे हद्दित रस्त्याने फोनवर बोलत पायी चालत जात असलेल्या चार लोकांकडून विविध कंपन्यांचे चार मोबाईल फोन हिसकावून जबरी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

त्यांच्याकडून 2 लाख 1 हजार किंमतीच्या दोन दुचाकी व विविध कंपन्यांचे एकूण चार महागडे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपी हे चोरी केलेले महागडे फोन मौजे खातर स्वतः च वापरत होते.

युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीष देशमुख, पोलीस हवालदार प्रवीण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अविनाश मिसाळ, संतोष आसवले, तुषार शेटे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1