Sangvi crime News : बांधकाम व्यावसायिकाच्या 45 लाखांच्या फसवणूक प्रकरणी माजी नगरसेवकासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – भागीदारीत जागा विकसित करण्याच्या बहाण्याने बांधकाम व्यावसायिकाची 45 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी माजी नगरसेवकासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.

राजू रामा लोखंडे (वय 50), प्रकाश रामा लोखंडे (वय 48, दोघे रा. वैदवस्ती, पिंपळे गुरव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत लक्ष्मण शिवाजी चव्हाण (वय 56, रा. पिंपळे गुरव) यांनी शनिवारी (दि. 31) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीचा प्रकार एप्रिल 2008 पासून 30 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला. राजू लोखंडे हे माजी नगरसेवक आहेत. तर त्यांच्या पत्नी सत्ताधारी भाजपच्या नगरसेविका आहेत. फिर्यादी चव्हाण हे बांधकाम व्यावसायिक आहेत.

_MPC_DIR_MPU_II

आरोपींनी फिर्यादी यांना ‘विलास महादू काशीद यांची जागा आम्ही घेतो. आपण 50-50 टक्के भागीदारीने ती जागा विकसित करू’ असे म्हणून त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर जागा खरेदी करण्यासाठी आरोपींनी फिर्यादी यांना पाच लाख रुपये जागा मालक विलास काशीद यांना द्यायला लावले.

वाचन चिठ्ठी करताना 15 लाख रुपये, समजुतीचा करारनामा करताना 15 लाख रुपये, कार्यालयीन कामासाठी, संरक्षण भिंत, पाण्याची टाकी बांधण्यासाठी 10 लाख रुपये खर्च करण्यास लावले. तब्बल 45 लाख रुपये घेऊन आरोपींनी फिर्यादी यांना जागा विकसनासाठी न देता त्यांची फसवणूक केली.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.