Sangvi Crime News : मोबाईल फोन चोरी करणारे दोघे सांगवी पोलीसांच्या जाळयात

एमपीसी न्यूज – मोबाईल फोन चोरी करणाऱ्या दोघांना सांगवी पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एक लाख चार हजार रुपये किमतीचे 15 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 4) करण्यात आली आहे.

मार्शल सबेस्टीन उर्फ मुकुल डिसोजा (वय 21, रा. के. / ऑ. स्वामी लक्ष्मीनगर लेन नं.5, पिंपळे गुरव, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यासोबत त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार विजय मोरे, अरुण नरळे आणि प्रविण पाटील यांना माहिती मिळाली की, दोन मुले कृष्णा चौक नवी सांगवी येथे चोरीच्या मोबाईल फोनचे लॉक तोडण्यासाठी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा चौकात सापळा लावला. कृष्णा चौकातील मोबाईलच्या दुकानात एक ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन लॉक तोडण्यासाठी घेवून आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे असलेल्या मोबाईल फोनबाबत चौकशी केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देवू लागल्याने त्यांना सांगवी पोलीस ठाण्यात आणून कसून चौकशी केली असता तो मोबाईल फोन चोरीचा असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांकडून पोलिसांनी एक लाख 4 हजार रुपये किमतीचे 15 मोबाईल फोन जप्त केले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले, तपास पथकातील पोलीस उप निरीक्षक यशवंत साकुंके, पोलीस हवालदार चंद्रकांत भिसे, पोलीस नाईक कैलास केंगले, सुरेश भोजणे, रोहिदास बो-हाडे, पोलीस शिपाई अरुण नरळे, विजय मोरे, प्रविण पाटील, शशीकांत देवकांत, नितीन खोपकर, अनिल देवकर, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, दिपक पिसे, शिमोन चांदेकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.