Sangvi Crime News : ग्राहक बनून आलेल्या दोन महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानातून 30 हजारांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज – ज्वेलर्सच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या दोन अनोळखी महिलांनी 30 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजताच्या कालावधीत आनंद नगर, जुनी सांगवी येथे घडला.

सुधीर रघुनाथ तरटे (वय 30, रा. आनंदनगर, जुनी सांगवी) यांनी बुधवारी (दि. 8) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आनंदनगर, जुनी सांगवी येथे कावेडिया ज्वेलर्स प्रा ली नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. 21 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दोन अनोळखी महिला ग्राहक बनून दुकानात आल्या. सोने खरेदीच्या बहाण्याने दोन्ही महिलांनी मिळून 30 हजार रुपये किमतीच्या 6.590 ग्रॅम वजनाच्या कानातील दोन सोन्याच्या रिंग चोरून नेल्या. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.