Pimple saudagar Crime News : बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे, विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी सापळा रचून एकाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 6) रात्री सव्वा आठच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरात करण्यात आली.

शुभम महादेव खडसे (वय 22, रा.नखाते वस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकजण पिंपळे सौदागर स्मशानभुमी जवळ हॉटेल गरीब नवाज शेजारी बेकायदा पिस्तुलासह वावरत असल्याची माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद शेंडकर यांना मिळाली.

त्यानुसार सांगवी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरोपी खडसे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एका पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे आढळून आले.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर, कर्मचारी चंद्रकांत भिसे, सुरेश भोजने, कैलास केंगले, रोहिदास बोहाडे, प्रविण पाटील, अरुण नरळे, नितीन खोपकर, दीपक पिसे, अनिल देवकर, विजय मोरे, हेमंतकुमार गुत्तीकोंडा, शिमोन चांदेकर या पथकाने कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.