Sangvi Crime : कोरोना आयसीयू वॉर्ड मधून रुग्णाचा मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या आयसीयु वॉर्ड मधून अज्ञात चोरट्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मोबईल फोन चोरून
नेला. उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना औंध जिल्हा रुग्णालयात घडली आहे.

याप्रकरणी मयत रुग्णाच्या मोठ्या भावाने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या
विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या लहान भावाला (वय 46) कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना औंध
येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयू वॉर्डमध्ये शिफ्ट
करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना फिर्यादी यांच्या भावाचा मृत्यू झाला.

दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरु असताना अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या भावाचा 12 हजार रुपये किमतीचा
मोबईल फोन चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.