Sangvi Crime : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार बलात्कार केला. महिलेने लग्नाबत विचारणा केली असता ‘मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुला काय करायचे ते कर’ अशी धमकी दिली. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला आहे. ही घटना सन 2017 ते मार्च 2020 या कालावधीत घडली आहे.

गोविंद माने (वय 31, रा. नवी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 30 वर्षीय पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोविंद याने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत वारंवार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. महिलेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने शिवीगाळ करत महिलेला मारहाण केली. ‘मी तुझ्याशी लग्न करणार नाही. तुला काय करायचे ते करून घे’ अशी आरोपीने महिलेला धमकी दिली. महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.