Sangvi crime : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल

The young man was stabbed with a scythe out of prejudice; Charges filed against three

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे सोमवारी (दि. 8) रात्री घडली.

शुभम आनंद घेडे (वय 24, रा. कृष्णराज कॉलनी, साठफूटी रोड, पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. 9) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी मुरेश दास व त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम हे सोमवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास गल्लीत शतपावली करीत होते.

त्यावेळी आपल्या साथीदारांसह तिथे आलेल्या आरोपी मुरेश याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून शुभम यांच्यावर कोत्याने वार करून गंभीर जखमी केले.

सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.