Sangvi Crime : दोन वाहन चोरांना अटक; चार गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी दोन वाहन चोरांना अटक केली आहे. एका चोरांकडून तीन तर दुसऱ्या वाहन चोरांकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

अतुल आत्माराम लालझरे (वय 23, रा. वेताळनगर, चिंचवड), रुपेश अजय कांबळे (वय 19, रा. लिंक रोड, चिंचवड) अशी अटक केलेल्या वाहन चोरांची नावे आहेत.

पोलीस हवालदार दळे आणि पोलीस नाईक शेटे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोप अतुल याला काळेवाडी फाटा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक लाख 20 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी जप्त केल्या. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील दोन आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक असे तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस शिपाई शिंदे आणि गावंडे यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रुपेश याला कस्पटे वस्ती, वाकड येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन लाख रुपये किमतीची एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे. यामुळे वाकड पोलीस ठाण्यातील एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी आदेश अशोक गायकवाड (वय 27, रा. पवार नगर, जुनी सांगवी) याला अटक केली आहे. आदेश गायकवाड याला पोलिसांनी 15 एप्रिल 2019 रोजी दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार कालावधीत संपण्यापूर्वी आदेश गायकवाड शहरात आल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो, गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये. अजिनाथ ऑंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.