Sangvi Crime Update: घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीचा मृत्यू, पतीला अटक

Sangvi Crime Update: Wife dies in domestic dispute घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या डोक्याला मार लागला. त्यात तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला

एमपीसी न्यूज – घरगुती कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीच्या डोक्याला मार लागला. त्यात तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना मयूर नगर पिंपळे गुरव येथे घडली.

पल्लवी बालाजी बिराजदार (वय 25) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बाबू विश्वनाथ सामनगावे (वय 50, रा. महादेव वाडी, ता. उदगीर, जि. लातूर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बालाजी बाबुराव बिरादार (रा. मयूर नगर, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बालाजी आणि मयत पल्लवी हे पती-पत्नी असून ते मयूर नगर, पिंपळे गुरव येथील त्रिमूर्ती नगर मधील देवकर यांच्या खोलीत भांड्याने राहतात. 12 जून रोजी रात्री अकराच्या सुमारास बालाजी आणि पल्लवी यांचे घरगुती कारणांवरून भांडण झाले.

या भांडणात पल्लवीने बालाजीच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे बालाजीने पल्लवी यांना भिंतीवर ढकलून दिले. यात पल्लवी यांच्या डोक्याला मुक्कामार लागला आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी औंध येथी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 19) रात्री पावणे आठ वाजता पल्लवी यांचा मृत्यू झाला.

पतीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.