Sangvi Crime : महिलेची साडेनऊ लाखांची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – महिलेशी मैत्री करून तिच्याकडून वेळोवेळी नऊ लाख 66 हजार 883 रुपये घेतले. ते पैसे परत न करता महिलेची फसवणूक केली. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना 2 ऑक्टोबर 2019 ते 3 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. ली वोंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत मैत्री केली. महिलेचा विश्वास संपादन करून तिच्याकडून वेळोवेळी नऊ लाख 66 हजार 883 रुपये घेतले. महिलेने ते पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे न देता महिलेचा विश्वासघात व फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.