Sangvi : गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट

एमपीसी न्यूज – गॅस गळती झाल्यामुळे एका हॉटेलमध्ये स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. हॉटेल मालक आणि कामगार या दोघांनी प्रसंगावधान दाखवत बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास सांगवी येथे घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेसात च्या सुमारास सांगवी मधील गंगानगर चौक येथील एका हॉटेलमध्ये गॅस गळती झाल्यामुळे सिलेंडरचा स्फोट झाला. स्फोट झाल्याने हॉटेलला आग लागली. दरम्यान हॉटेल मध्ये काम करत असलेले मालक आणि एक कामगार तात्काळ बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. हॉटेलमध्ये बिर्याणीची मोठी ऑर्डर आली असल्याने मालक आणि एक कामगार सकाळी लवकर कामाला लागल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनीही प्रसंगावधान दाखवल्यामुळे दोघांचा जीव वाचला.

अग्निशमन विभागाला माहिती मिळताच संत तुकाराम नगर आणि रहाटणी येथील दोन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीमध्ये हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.