BNR-HDR-TOP-Mobile

Sangvi : पिंपळेगुरवमध्ये घरात वृद्धाचा कुजलेला मृतदेह आढळला

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथे राहत्या घरामध्ये एका 65 वर्षीय वृद्धाचा कुजलेला मृतदेह आढळला. हा प्रकार रविवारी (दि. 10) दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आला.

चंद्रकांत गेनू भोसले (वय 65, रा. सुवर्णपार्क, पिंपळेगुरव) असे मृतदेह आढळलेल्या वृद्धाचे नाव आहे.

उपनिरीक्षक श्रीकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रकांत यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. तेव्हापासून ते त्यांच्या लहान मुलासोबत पिंपळेगुरव येथे राहत होते. त्यांचा मुलगा तीन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने ते एकटेच घरात होते. दरम्यान, चंद्रकांत यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार उघडले असता चंद्रकांत यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. चंद्रकांत हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. या आजारामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.